Home नांदेड राजश्री हेमंत पाटील यांना मातृशोक

राजश्री हेमंत पाटील यांना मातृशोक

94
0

मजहर शेख,

नांदेड: खासदार हेमंत पाटील यांच्या सासूबाई व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या आई तथा यवतमाळ येथील महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी पुष्पाताई महल्ले यांचे कोरोना आजाराने मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल मध्ये निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७२ होते.

पुष्पाताई यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी १८ एप्रिल रोजी नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असून सुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकने जसलोक हॉस्पिटल मुबंई येथे नेण्यात आले.सोमवार पासून उपचार सुरू असतांना आचनक सकाळ पासून तब्येत खालावली होती व उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता अश्यातच आज(दि.27 )दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात मुलगी राजश्रीताई पाटील ,पुतणे ,नातवंड असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर मुंबई येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.