कार्यालय प्रतिनिधी
संपूर्ण राज्यातील पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या यादृष्टीने मराठी भाषेत एका नाविण्यपूर्ण मोबाईल अँपची निर्मिती करण्यात आली आहे.
अनेक वैशिष्ट्ये असलेल्या मराठी भाषेतील या मोबाईल अँपचे नाव “महासंपर्क अँप” असून राज्यातील कानाकोपऱ्यात हा अँप डाउनलोड केला जात आहे.पत्रकारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, पत्रकार बांधवांसह शासकीय , प्रशासन , पदाधिकारी व नागरिकांनाही पत्रकारांशी सहज संपर्क साधता यावा या प्रामाणिक हेतूने या “महासंपर्क अँप” ची निर्मिती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील तरूण पत्रकार परवेज पठाण यांनी या मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. सदरील “महासंपर्क अँप” च्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हे , शहर , तालुके व ग्रामीण पत्रकारांची फोटोसह माहिती सहज उपलब्ध होईल .
ह्या महासंपर्क अँप मध्ये प्रिंट मीडिया , डिजिटल मीडिया आणी इलेक्टॉनिक मीडिया अशा सर्व पत्रकारांची नोंदणी केली जात आहे.
राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अँपची निर्मिती करण्यात आली असुन ह्या “महासंपर्क अँप” मध्ये वर्तमानपत्र किंवा पोर्टलचे किंवा चॅनलचे नाव, लोगो अथवा टायटल बॅनर, थोडक्यात माहिती, पत्रकाराचे नाव, पत्रकाराचा फोटो, मोबाईल नंबर व पत्ता टाकण्यात येत आहे. तसेच संपूर्ण राज्यातील पत्रकारांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करणारी यंत्रणा नव्हती मात्र आता या मोबाईल अँपमुळे एका क्लिकवर समस्त पत्रकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.
या अँपमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचा परस्परांशी संपर्क व संवाद वाढू शकेल, शिवाय अडीअडचणीत सुध्दा या अँपची मदत होवू शकेल. राज्यातील अनेक पत्रकार आणी पत्रकार संघटनांनी सदरील अँपचा उपक्रम अभिनंदनीय व कौतुकास पात्र असल्याचे नमूद केले आहे.
सदरील मोबाईल अँप मध्ये राज्यातील पत्रकारांची सशुल्क नोंदणी सुरू असून आतापर्यंत अनेक पत्रकारांनी नोंदणी सुध्दा केली आहे. सर्व पत्रकारांनी 9890515043 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन “महासंपर्क अँप” च्या वतीने करण्यात आले आहे.
सदरील मोबाईल अँप वापरण्याच्या दृष्टीने सर्वांसाठी प्ले स्टोरवर फ्री मध्ये उपलब्ध असून ॲपमध्ये नोंदणीसाठीही नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, चांगली स्पीड, फुल स्क्रीन मध्ये माहिती, अनेक सुविधा तसेच वापरण्यास सहज व सोपा असलेला हा “स्वदेशी” अँप सर्वांना उपयुक्त होणार आहे .