Home नांदेड नायगाव येथे सुरू होत असलेल्या कोव्हिड सेंटरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते...

नायगाव येथे सुरू होत असलेल्या कोव्हिड सेंटरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते शुभारंभ

162

राजेश एन भांगे

देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून हे संक्रमण रोखण्यासाठी राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत.
तर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रुग्णांचे हाल होत असुन उपचाराकरीता बेड मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व नायगांव तालुक्यातील नागरिकांच्या उद्भवलेल्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण यांनी कोव्हिड रुग्णांसाठी साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याच अनुषंगाने आज रोजी नायगाव तालुक्यातील कोवीड रुग्णांनसाठी सुरू होत असलेल्या साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे शुभारंभ जिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

तरी या कोविड सेंटर च्या शुभारंभ प्रसंगी विधान परिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजुरकर, माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, मनपा आयुक्त सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, जिल्हापरिषद शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, तहसीलदार गजानन शिंदे, नायगाव चे पोलिस निरीक्षक श्रीआर पडवळ, पंचायत समिती उपसभापती संजय शेळगावकर, मा.श्रीनिवास.पा. चव्हाण, एज्युकेशन सोसायटी चे सचिव रविंद्र वसंतराव पा.चव्हाण, नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय पा.चव्हाण, धनराज शिरोळे तसेच नगरपंचायतचे सर्व नगरसेवक आणि डॉक्टरसेलचे पदाधिकारी पत्रकार बांधव व तसेच गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.