Home महत्वाची बातमी दारू महाग झाली म्हणून सॅनिटायझर पिले अन ते सहा मित्र गेले ,

दारू महाग झाली म्हणून सॅनिटायझर पिले अन ते सहा मित्र गेले ,

1971

 

 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खळबळजनक घटना ,

अमीन शाह

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे . काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा तर रात्रीच्या सुमारास आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे . यांचा सर्व व्यक्तींचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे . मृतकांमध्ये दत्ता कवडू लांजेवार ( 47 ) मु.तेली फैल वणी , नुतन देवराव पाटणकर रा , ग्रामीण रुग्णालय जवळ वणी , संतोष उर्फ बालू मेहर ( 35 ) रा . एकता नगर , विजय बावणे रा . वणी असे मृतकांचे नाव आहेत . काल संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे व गणेश उत्तम शेलार या दोघांचा मृत्यू झाला . त्यानंतर काही वेळातच दत्ता लांजेवार याचा मृत्यू झाला . तर पहाटे आणखी तिघांचा घरीच मृत्यू झाला . मृत्यू झालेल्या व्यक्तींनी सोबतच नशा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे . गेल्या 24 तासांमध्ये 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे . हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे .
मिळालेल्या माहितीवरून , दत्ता लांजेवार , नुतन पाटणकर , संतोष उर्फ बालू मेहर , विजय बावणे , सुनील ढेंगळे , गणेश शेलार , दत्ता लांजेवार हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे . त्यांना मद्य प्राशनाची सवय होती . लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री बंद झाल्याने यांनी पिण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतली . दरम्यान त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले . त्यानंतर एकाएकाची तब्येत बिघडू लागली . दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सुनील ढेंगळे , गणेश शेलार व दत्ता कवडू लांजेवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला . दुसरीकडे नूतन देवराव पाटणकर याला अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता . मात्र तिथून तो उपचार न घेताच निघून आला . त्याचा पहाटे घरीच मृत्यू झाला . संतोष उर्फ बालू मेहर ( 35 ) व विजय बावणे हे मजुरी करायचे . बालू हा आधी पुण्यात मजुरीचे काम करायचा मात्र दोन तीन वर्षांआधी तो वणीत परत आला . बालू याचा पहाटे साडे तीन वाजताच्या दरम्यान घरी मृत्यू झाला . तर विजयचा देखील रात्रीच घरी मृत्यू झाला . सुनील ढेंगळे आणि दत्ता लांजेवार यांचा मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम सुरु आहे . या दोघांचा मृत्यू सॅनिटायझर पिल्याने झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे

साथ साथ ???

सर्वांनी एकत्रच केले सॅनिटायझरचे सेवन या सर्वांचा गृप असल्याची माहिती आहे . सात मृतकांव्यतिरिक्त यात आणखी 3-4 व्यक्ती असल्याची माहिती आहे . लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारू मिळत नसल्याने त्यांनी सॅनिटायझर पिण्यास सुरूवात केली होती . दोन दिवसांआधी यांनी नशा करण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतल्याची माहिती आहे . कॅन विकत घेऊन त्यांनी एकत्रच सॅनिटायझरचे सेवन केल्याचा संशय आहे . यातील सात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे . हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे . यांच्यासोबत आणखी किती लोकांनी सॅनिटायझरचे सेवन केले हे तपासात उघड होणार . यातील केवळ दोघांच्या मृत्यूची सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे .
.