Home नांदेड लॉकडाउनची सिंदखेड पोलिसांकडून कडक अंमलबजावणी,चौकात वाहनांची तपासणी.

लॉकडाउनची सिंदखेड पोलिसांकडून कडक अंमलबजावणी,चौकात वाहनांची तपासणी.

220
0

प्रतिनिधी : मजहर शेख

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही- सपोनि भालचंद्र तिडके


नांदेड/किनवट, दि : २४:- एकीकडे राज्यात कोरोना ने थेमान घातलेला दिसून येत आहे.आणि किनवट तालुक्यातील सारखणी येथे नागरिक रस्त्यावर बिनधास्त पणे फिरत असल्याने.सिंदखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही तसेच बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी दिला आहे.
वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे राज्यसरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केलेला आहे.तसेच सारखणी येथे सिंदखेड पोलिसां कडून वाढत्या कोरोना विषाणू चा पसार होऊ नये यासाठी लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर निघू नये आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून सुध्दा काहिही काम नसताना काहीजण कामाचा हिला करून घराबाहेर निघत आहेत. जो कोणीही बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी दिला आहे.
सारखणी परिसरातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता,बिनधास्तपणे वागताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना आणि संचारबंदी असताना विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनि भालचंद्र तिडके यांनी कडक कारवाई केल्यामुळे रिकामी टेकड्याना चांगला धसका घेतल्याचे चित्र सारखणी व परिसरात दिसू लागले आहे.सपोनी निरिक्षकांच्या कारवाईने दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्यावर आणि बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी दिला आहे.