Home विदर्भ घाटंजी येथील फिजा अंजुम यांचा पहीला रोजा पुर्ण

घाटंजी येथील फिजा अंजुम यांचा पहीला रोजा पुर्ण

353

यवतमाळ / घाटंजी  (प्रतिनिधी)  – मुस्लीम धर्मात रमजान महीना मोठा व पवित्र महीना मानला जातो.मुस्लीम समाजात रमजान महीन्यात ३० दिवसाचे उपवास( रोजा) ठेवतात. पहाटे ४ वाजता ऊठुन रोजाची तयारी करतात. व सांयकाळी ७ वाजण्याचे सुमारास रोजा सोडतात.
रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव अल्ला ईश्वराची प्रार्थना करतात. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा ठेवतात. रोजाच्या अवस्थेत अन्नपाण्याच्या सेवनास सक्त मनाई असते. पोटाची भूक, पाण्याची तहान याची जाणीव प्रत्येकाला व्हावी, यासाठी इस्लामने रोजे अनिवार्य केले
दिवसभर काही ही न खाता पिता रोजा पुर्ण करता असा रोजा घाटंजी येथील दैनिक विदर्भ मतदार प्रतिनिधी कजुम कुरेशी यांची मुलगी फिजा अंजुम वय १० वर्षे आज पहीला रोजा पुर्ण केला आहे, १५ तास २० मिनिटेचा रोजा नमाज तसबीह व प्रार्थना दुवा करुन पुर्ण करून अन्न, पाण्याविना इतरही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या पवित्र महिन्याच्या दिवसांमध्ये पवित्र कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे मुस्लिम बांधव घरातूनच नमाज अदा करत आहेत. कोरोनाचे संकट दूर होऊन शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी या पवित्र महिन्यात अल्लाहकडे विशेष दुआ मागण्यात येत आहे
यावेळी आजोबा आजी आई वडील काका काकू व कुरेशी कुटुंबातील सर्व उपस्थित होते,