Home मराठवाडा वसमत शहरात 43लाख रु किमतीचा गुटख्याचा साठा जप्त ,

वसमत शहरात 43लाख रु किमतीचा गुटख्याचा साठा जप्त ,

99
0

पोलिसांची कामगिरी ,

 

हिगोली.

श्रीहारी आभोरे पाटिल

हिगोली जिल्ह्यातील वसमत शहरात सोमवार पेठ कबुतरखाना भागात वसमत शहर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे याची या आठवड्यातील हि मोठि दुसरी कार्यवाही केली आहे.
शहर पोलीस निरीक्षक याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरूवारी रात्री शहरातील सोमवार पेठ येथील कबुतर खाना या भागात विना परवाना अवेध प्ररकारे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर साह्यक पोलीस सतीश देशमुख याच्या नेतृत्वाखाली वसमत शहर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे याना माहिती मिळताच आपल्या पोलीस सहकारी पथकाने सापळा रचुन मोठीं कार्यवाहि केली.
यात 13 लाख 44हजार किमतीचा वजीर गुटका 18 लाख 90 हजार किमतीचे राजनिवास गुटखा 18 लाख किमतीचे गोवा गुटखा एकुन 54 पोती नायलॉन चे पोते मिळाले यात माल वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन आटो एम. एच. 25 .पी 2799 नंबरचे वाहन जप्त केले आहे. यातील एकुन दोन आरोपीं असुन त्यातील एका आरोपी मुजाहिद्द खा नसिर खा पठाण याला ताब्यात घेतले आहे . एक आरोपी फरार आसल्याची माहिती मिळाली आहे.