Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड” देगलूर – मतदारसंघाचे (काँग्रेसचे) आमदार...

नांदेड जिल्ह्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड” देगलूर – मतदारसंघाचे (काँग्रेसचे) आमदार अंतापुरकर अनंतात विलीन

298

राजेश एन भांगे

 

परवाच नांदेड जिल्ह्यातील मोठे राजकिय प्रस्त समजले जाणारे माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांच्या निधनाने नायगांव तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असतानाच,

देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय ६३ वर्ष) यांचे आज दि. ९ एप्रिल रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मुंबई येथील हाॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान दुखःद निधन झाले.

त्यांना २५ दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आमदार अंतापूरकर हे २५ दिवसांपूर्वी कोरोना बधित झाले होते.
तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

नांदेड येथील भगवती रुग्णालयात ३ दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.
मागील ८ दिवसापासून ते अत्यवस्थ होते.

अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अत्यंत विश्वासू व निकटवर्तिय आमदारांन पैकि मानले जाणारे
एक हळव्या मनाचा व्यक्तीमत्व
आमदार आपल्या पासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

आमदार अंतापूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.