Home विदर्भ सावळी – सदोबा येथील किशोर केशेट्टीवार विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात भादंवि 420...

सावळी – सदोबा येथील किशोर केशेट्टीवार विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात भादंवि 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

817

आरोपीला अद्यापही अटक नाही

आरोपी किशोर

अयनुद्दीन सोलंकी

 

घाटंजी ( यवतमाळ ) – पारवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सावळी – सदोबा येथील संशयीत आरोपी किशोर दादाजी केशेट्टीवार यांनी जागृती शेळीपालन, अँग्रो फुड्स अँन्ड ईन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी या शेळी पालनाच्या व्यवसायात पैसे गुंतवून फिर्यादी प्रशांत मारोतराव खरात (आर्णी तालुका भाजपा उपाध्यक्ष) यांची फसवणुक केल्या प्रकरणी आरोपी किशोर केशेट्टीवार विरुद्ध भादंवि 420, 506 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पारवा पोलीसांनी आरोपीला राजकीय दबावाखाली अद्यापही अटक केली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, जागृती शेळीपालन या कार्यक्रमाचे उदघाटन् माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे, राजा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन 2014 मध्ये संपन्न झाल्याचे तक्रारदार प्रशांत खरात यांनी सांगितले.
पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे पुढील तपास करीत आहे.
जागृती शेतीपालन या प्रोजेक्ट्स कडून रुपये 50,000 बाँन्ड पेपर, पंढरपूर कार्यालयातुन रजिष्टर पोष्टाने पाठविलेले परत आल्याचे पत्र, जागृती शेळीपालन अँग्रो फुड्स अँन्ड ईन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपीचे भव्य फलक ज्यावर प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून अमर भुपेंद्र शिंदे नावाचा उल्लेख असलेला फलक सुद्धा पुराव्या दाखल फिर्यादीने पोलीसवाला आँनलाईन मिडीया कडे सादर केला आहे. या प्रकरणामुळे सावळी – सदोबा परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणात आणखी 15/20 लोकांची अशीच फसवणुक झाल्याचे विश्वासनिय वृत आहे. दरम्यान, सदर प्रकरणात जागृती शेतीपाळन प्रोजेक्ट्स मध्ये कार्यरत असलेले अनेक गर्भश्रीमंत, अमर नामक व्यक्तीसह ईतर लोक आरोपी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सदर प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याने पारवा पोलीसांनी अद्यापही आरोपीला अटक केलेली नसल्याचे समजते.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार याने सन 2014 मध्ये फिर्यादी प्रशांत खरात याची भेट घेऊन जागृती अँग्रो फुड्स अँन्ड इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी मध्ये शेतीपालनात व्यवसायात काही रक्कम गुंतवली तर अनेक फायदे होउ शकतात, असे आरोपी किशोर केशेट्टीवार यांनी फिर्यादीस सांगीतले होते. तसेच किमान 5000 रुपये व कमाल कितीही रक्कम गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल, असे सांगून कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी प्रशांत खरात यांनी आरोपी केशेट्टीवार यास सन 2014 पासून रुपये 5000 प्रमाणे रुपये 50,000 गुंतवणूक केली. तसेच आरोपीने 27 आँक्टोंबर 2014 ते 27 आँगस्ट 2020 या कालावधीत बाँन्ड पेपर सुद्धा फिर्यादीस आणून दिला. विशेष म्हणजे बाँन्ड पेपरची मुदत संपल्यावर फिर्यादी प्रशांत खरात याने केशेट्टीवार यांना बाँन्ड पेपरची मुदत संपल्याने रक्कमेची मागणी केली. मात्र, आरोपीने रक्कम देण्यास टाळाटाळ करुन कंपनी सोबत पंढरपूर (सांगली) येथील कंपनीत पत्रव्यवहार करण्यास सांगितले. त्यावरुन खरात यांनी कंपनीकडे रजिष्टर पोष्टाने पत्र व्यवहार केला, मात्र, तेथे कोणतेही कार्यालय उपलब्ध नसल्याने पाठविलेले कागदपत्रे परत आले, असा शेरा पोष्टमन ने मारुन परत पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने खरात यांनी 16 जानेवारी रोजी आरोपीस कंपनीत पाठविलेले पत्र परत आले आहे अशी विचारणा केली असता, आरोपीने फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली, अशा रिपोर्ट वरुन पारवा पोलीसांनी संशयीत आरोपी किशोर दादाजी केशेट्टीवार विरुद्ध जिवे मारण्याची धमकी देउन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, पारवा पोलीसांनी अद्यापही आरोपीला अटक केलेली नसल्याने पोलीसांविषयी संशय निर्माण होत आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे करित आहे.