Home विदर्भ विकासकामांना मागणी प्रमाणे पूर्ण निधी देणार

विकासकामांना मागणी प्रमाणे पूर्ण निधी देणार

141
0

चंद्रपूर, दि. 06 : ब्रम्हपुरी शहराचा विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे म्हणून यंत्रणेद्वारे ज्या-ज्या विकास कामांकरिता निधीची मागणी केली जाईल, त्या सर्व कामांना निधीं उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  ब्रम्हपुरी येथे दिले.

नुकतेच ब्रम्हपुरी येथे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी पालकमंत्री यांनी सर्वप्रथम कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. ऑक्सीजन पाईपलाईन व 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने रूग्णालयात भरती करूण घ्यावे तसेच ऑक्सीजनचा तुटवडा पडू नये यासाठी उपाययोजना करून ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी मनरेगा, नगरपरिषद, कृषी विभाग, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना इ. बाबत यावेळी आढावा घेतला. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.