Home महाराष्ट्र मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी बंद ,

मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी बंद ,

139
0

 

अमीन शाह

महाराष्ट्रातील covid 19 रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे . यासाठीच महाराष्ट्र शासनानं नवीन मार्गदर्शक सूचना आणि कडक निर्बंध जाहीर केले आहेत . त्यानुसार आता मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी ३० एप्रिलपर्यंत बंद राहिल . तथापि , मंदिरातील आतील दैनंदिन कामकाज औपचारिक वेळेत सुरूच आहे . फक्त निवास आणि प्रसादलय ( भाविकांसाठी जेवणाचे हॉल ) बंद राहतील , असं ते म्हणाले . दरम्यान , आज रात्री ८ वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिरात दर्शन होणार नाही . दर्शनासाठी क्यूआर कोड देणं देखील बंद केलं गेलं आहे . परंतु थेट पूजा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाईल . आरतीवेळी केवळ पुजारी आणि कर्मचारी हजर राहतील .महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अधिसूचनेनुसार COVID 19 रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे धार्मिक स्थळे बंद राहतील . त्यामुळे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टनंही ( एसएसएसटी ) महाराष्ट्रातील शिरडी इथलं साई बाबा मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . महाराष्ट्र सरकारनं नाईट करफीयु आणि वीकएन्ड करफीयु सह राज्यात लॉकडाउनसारखे निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला .