Home विदर्भ कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत..!

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत..!

238

जिल्हा सरचिटणीस पदी सहाय्यक लेखाधिकारी भारत भितकर यांची अविरोध निवड..!

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – जिल्हा परिषद कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची सभा अमरावतीचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेत जिल्हा सरचिटणीस पदासाठी सहाय्यक लेखाधिकारी भारत भितकर यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे सभासदाची नोंदणी अभियान सुरू करण्याबाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक मागासवर्गीय कर्मचारी यांनी या मातृ संघटनेचे सभासद व्हावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. प्रत्येक संवर्ग मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मित्र संघटने सोबत काम करण्यास हरकत नाही. परंतु; कास्ट्राईब कर्मचारी संघटनेमध्ये सभासद होणे अनिवार्य आहे, असेही आवाहन करण्यात आले. तसेच संघटनेची शक्ती वाढवण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. कोषाध्यक्ष राजेंद्र खरतडे यांनी ज्या सभासदांकडे वेळ आहे त्यांनी कृपया वेळ देउन सहकार्य करण्याची विनंती केली. सर्व सभासदांनी तन मन धनाने मदत करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.संघटना चालवण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करून कोषाध्यक्ष राजेंद्र खरतडे यांनी स्वतः संघटनेला 5 हजार रुपयांचा धनादेश देण्याचे जाहीर केले. कार्याध्यक्ष सुहास परेकर यांनी एक हजार रुपये तर, नवनिर्वाचित सचिव भारत भितकर यांनी सुद्धा एक हजार रुपये रोख जमा दिले. जिल्ह्याभरातील एस. सी., एस. टी., ओबीसी, व्हिजेएनटी ईत्यादी कर्मचारी बांधवांनी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे असे, आवाहन करण्यात आले. तसेच जिल्ह्यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय, अत्याचार, काही सेवाविषयक प्रश्न प्रलंबित असतील तर त्यांनी जिल्हा संघटनेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावे. तसेच त्यांना खरोखरच न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आवर्जून सांगण्यात आले. आजच्या सभेमध्ये जिल्हा कार्यकारणीचे नव्याने पुनर्घटन करण्यात आले. सभे करीता विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, जिल्हाध्यक्ष जी. आर. इंगोले, नामदेवराव थुल, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तुषार आत्राम, सुहास परेकर, राजेंद्र खरतडे, भारत भितकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.