Home विदर्भ धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती जिवंत, हादरलेल्या मुलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती जिवंत, हादरलेल्या मुलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

1952

तुमच्या रुग्णाची तपासणी झाल्याशिवाय शव सोपविण्याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे देखील संबंधित डॉक्टरांनी सांगितले. अशा परिस्थितीतही वडिलांना एकदा अखेरचे बघू द्या अशी विनवणी मुलाने केली. कसेबसे वडिलांच्या बेड जवळ मुलगा पोहोचला आणि हंबरडा फोडताच वडिलांनी डोळे उघडले.

यवतमाळ , दि. ०२ :-  एक दिवसांपूर्वी वडिलांना खोकल्याचा त्रास झाल्याने उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजताच्या सुमारास रुग्णालयातून मुलाला फोन आला की वडिलांची तब्येत गंभीर आहे, लवकर पोहोचा, असा निरोप मिळाला. हादरलेला मुलगा रुग्णालयात पोहोचताच तुमच्या पेशंटचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती दिली गेली. या बातमीने मुलाचे अवसानच गळाले. याबाबत मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

तुमच्या रुग्णाची तपासणी झाल्याशिवाय शव सोपविण्याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे देखील संबंधित डॉक्टरांनी सांगितले. अशा परिस्थितीतही वडिलांना एकदा अखेरचे बघू द्या अशी विनवणी मुलाने केली. कसेबसे वडिलांच्या बेड जवळ मुलगा पोहोचला आणि हंबरडा फोडताच वडिलांनी डोळे उघडले. बघितले तर काय वडील जिवंत होते, त्यांचा श्वासोच्छवास सुरू होता. मात्र, डॉक्टरांनी उपचार थांबविले होते. हे समजताच मुलाने वडिलांवर उपचार सुरू करा, त्यांना वाचवा अशी आरडाओरड केल्याने डॉक्टर व संबंधित स्टाफ धावून आला. मृत घोषित केलेला रुग्ण जिवंत बघून डॉक्टरांनी चुकीने होऊ शकते असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. त्यानंतर रुग्णाच्या मुलास बाहेर पाठवले. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील हा संतापजनक प्रकार असल्याची तक्रार मुलाने जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना केली आहे.

३० मार्चला दिघी येथील ७० वर्षीय व्यक्तीला खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांच्या मुलाने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणले. डॉक्टरारंनी न्युमोनिया व कफची शक्यता वर्तवून रुग्णास वार्ड क्र. १९ मध्ये भरती करुन घेतले. दुसऱ्या दिवशी ३१ मार्चला रात्री ११ वाजताच्या सुमारास रुग्णालयातून मुलाला फोन आला. वडिलांची प्रकृती गंभीर आहे, असे सांगितल्या गेले. मुलगा रुग्णालयात पोहोचला असता डॉक्टरांनी तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. वार्ड क्र. २५ मध्ये त्यांचे शव आहे असे सांगितले. परंतु, बेडजवळ जावून बघताच वडील जिवंत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मृताची कोरोना चाचणी केल्याशिवाय शव ताब्यात देण्याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे देखील सांगितले. डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही अशा प्रकारची तक्रार मुलाने आता अधिष्ठातांकडे केली आहे. या तक्रारीची प्रतिलिपी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली आहे. सोबतच वडीलांची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली असल्याचे मुलाने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाने जबर मानसिक आघात झाला असून संबंधित डॉक्टर व स्टाफची वागणूक देखील सौजन्याची नव्हती. त्यामुळे असा प्रकार यापुढे घडू नये, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची बोळवण होऊ नये, अशी मागणी तक्रारकर्त्या मुलाने केली आहे.