
अकोला – आज दिनाक १/०४/२०२१ रोजी वंचित बहुजन महिला आघाडी अकोट ता यांच्या वतीने मा .तहसीलदार तहसील कार्यालय अकोट जी.अकोला मार्फत माननीय, मुख्यमंत्री महाराष्ट्र्र राज्य, मुंबई राज्य महिला आयोग महारष्ट्र मुंबई पुलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र सिविल लाईन्स नागपुर नेवेदन देणेयात आला विषय अमरावती जिल्हायतील मेळघाट व्याघ्र परकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेला त्रास तसेच अश्लील बोलूंन गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याने आत्मह्त्या केली आहे.

हया प्रकरणात शिवकुमार यांना पोलीसांनी अटक केली आहे मात्र या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप मृत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली यांनी केलेले आहेत.
रेड्डी नावाचे अप्पर प्र.भू.व.संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट वाघप्रकल्प अमरावती यांनी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्ररिवार कुठलीही कार्यवाही केली नाही. महिला अधिकाऱ्याचा छळ आणि आत्महत्या या प्रकरणात रेड्डी नावाचे अधिकारी सुध्दा दोषी असल्याचे दिसते. सबब या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन इतर दोषी अधिकाऱ्यावर सह आरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडी ता. अकोट जी. अकोलाच्या वतीने करण्यात येत आहे.
मेळघाट वाघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकिय निवास स्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख धक्कादायक आरोपासह केलेला आहे असे प्रसार माध्यमातून कळले.
शिवकुमार यांच्या असंख्य तक्ररि असतांना रेड्डी गांभीर्याने घेत नसल्याने मेळघाट दलदल बनल्याचा आरोप देखील केलेला आहे . दीपाली यांचे आरोप पाहता वनविभाग हा माहीला करिता छळ छावनी बनला आहे असे दिसते. वनविभागाच्या अधिकाऱ्याना महिला अधिकारी, कर्मचारी सहज सावज वाटतात.वारिष्ठानि कही कार्यवाही केली नसल्याने का महिला अधिकाऱ्याला जीव घावा लागला. सबब पुर्ण महाराष्ट्रात वनविभाग महिला अधिकारी ,कर्मचारी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे गरजेचे आहे.
दीपाली चव्हाण प्रकरणात शिवकुमार व इतर अधिकारी ज्यांच्यावर सुसाईड नोटमध्ये आरोपानुसार सहभागी सर्वावर कडक कार्यवाही करण्यात यावी.करिता तक्रार सादर निवेदन देणेयात अला या निवेदन देता वेळी सुनीता दिलीप हिरोळे ता अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी सौ. लता शत्रुघ्न नितोने सभापति पं स अकोट सौ. मंगला वानखड़े शहर अध्यक्ष अकोट वंचित महिला आघाडी. सौ. कोकिला मनोहर इंगळे महासचिव अकोट सौ जयश्री सुरेश टेलगोटे सचिव मीरा गजानन तायडे उपअध्यक्ष सौ. माया निरंजन हिवराळे उपअध्यक्ष श्त्रगुन नितोने मो जमील उर्फ जमुपटेल महासचिव वं. ब. आ. अकोट निलेश राधेश्याम झाड़े संघटक प्रकाश सुरेशराव राउत व आदि उपस्थित होते.










































