Home विदर्भ पार्डी नस्करी येथे भीषण आग तीन घरे व सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी

पार्डी नस्करी येथे भीषण आग तीन घरे व सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी

184
0

पंधरा लाखाच्या वर नुसकान झाल्याचा प्राथमिक अंदाज

यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथे आज सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन घरे व सहा गोठे जळून खाक झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी, नुकसानीचा आकडा प्राथमिक अंदाजानुसार पंधरा लाखाच्या घरात आहे. दुर्गाबाई अशोक उईके, सतीश उत्तमराव साखरकर, सुशांत प्रल्हाद वाघाडे आदी तिघांचे घरे जळून भस्मसात झाली आहे तर वसंत काळूराम पवार, अंकुश रामकृष्ण साखरकर, भगवान रामकृष्ण साखरकर, मधुकर देवराव साखरकर, नंदाबाई खुशाल तऱ्हेकार अशी गोठे जळालेल्या मालकांची नावे आहेत.

सकाळी आग लागल्याचे निदर्शनास येताच गावातील लोकांनी एकत्रित येऊन जीवाची पर्वा न करता आग विझविन्याचे आटोकाट प्रयत्न केले. गावाच्या मध्यभागी आग लागल्याने व त्यातच सकाळी हवा जास्त असल्यामुळे आग वाढतच गेली. मात्र माणसे मागे हटली नाहीत. त्यात गावातील सरपंच अल्का देवतळे व अनिल हटवारे यांनी नरेंद्र लांजेवार व पत्रकार महेंद्र देवतळे यांना आगीची कल्पना दिली. तहसीलदार पूजा माटोडे यांना सदर वृत्त कळताच मुख्याधिकारी अमोल माळकर
यांचेशी चर्चा करून अग्निशमन दलाची गाडी घटना स्थळावर पाठविली. या दोन्हीही अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून विना विलंब अग्निशमन गाडी पाठविल्याने व गावातील लोकांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली.

तहसीलदार पूजा माटोडे यांची घटनास्थळी भेट
आगीचे वृत्त कळताच वि तहसीलदार पूजा माटोडे यांनी आपल्या चमू सह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांचे सात्वन केले. तसेच मंडळ अधिकारी व्ही व्ही सोळंखे व तलाठी चेतन ठाकरे यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून अहवाल सादर केला. ग्रामसेवक अमोल मंचलवार सुद्धा उपस्थित होते.

नुसकान भरपाई मिळण्याची अपेक्षा

मागील वर्षी पासुन थैमान घातलेल्या कोरोणामुळे हाताला कोणतेही काम नाही, पीक नाही त्यातच दुर्दैवाने झालेली ही आणि आणि त्यात झालेले नुसकान यामुळे सदर सर्व परिवार परत बंद झाले असून शासनाकडून मुस्कान भरपाई मिळण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.