Home विदर्भ 9 मृत्युसह जिल्ह्यात 400 जण पॉझेटिव्हसह 235 जण कोरोनामुक्त

9 मृत्युसह जिल्ह्यात 400 जण पॉझेटिव्हसह 235 जण कोरोनामुक्त

324
0

    यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात नऊ मृत्युसह 400 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 235 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 व 62 वर्षीय पुरुष आणि 93 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 50 वर्षीय महिला, कळंब येथील 45 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील 51 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 75 वर्षीय पुरुष आणि आर्णि येथील एका पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.28) पॉझेटिव्ह आलेल्या 400 जणांमध्ये 274 पुरुष आणि 126 महिला आहेत. यात यवतमाळातील 133, दिग्रस 32, नेर 21, आर्णि 4, पुसद 34, पांढरकवडा 23, उमरखेड 23, वणी 33, घाटंजी 10, दारव्हा 19, राळेगाव 4, बाभुळगाव 17, झरी जामणी 7, कळंब 12, महागाव 25 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

            रविवारी एकूण 4618 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 400 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4218 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2604 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 27551 झाली आहे. 24 तासात 235 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 24330 आहे. तर जिल्ह्यात एकूण 617 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 261505 नमुने पाठविले असून यापैकी 252933 प्राप्त तर 8572 अप्राप्त आहेत. तसेच 225382 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.