Home विदर्भ कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य…!

कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य…!

283
0

 अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार

यवतमाळ, दि. 27 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युच्या संख्येत झालेली वाढ कमी करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

जिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसुत्रीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. नागरिकांनीसुध्दा नियमितपणे मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिं आणि टेस्टिंग करून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तसेच मृत्युदर कमी करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याला आपले प्राधान्य आहे, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले