Home नांदेड दमदाटी करणार्‍या नगरसेविके च्या पतीस पाबंद करा.

दमदाटी करणार्‍या नगरसेविके च्या पतीस पाबंद करा.

528

मजहर शेख

 कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

नांदेड/माहूर, दि. २७  :-  माहूर नगर पंचायत माहूरच्या नगर सेविका सौ.ज्योतीताई विनोद कदम यांचे पती विनोद शंकर कदम हे नगर पंचायतीच्या कामकाजा मध्ये नेहमी हस्तक्षेप करुन कर्मच्या-यांना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (अट्रॉसिटी) चा गुन्हा दाखल करील अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याने त्यांना पाबंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगर पंचायत कर्मचारी संघटना माहुर च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी विद्याताई कदम यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
माहुर नगर पंचायतच्या विद्यमान नगरसेविका सौ.ज्योतीताई विनोद कदम , यांचे पती विनोद शंकर कदम यांच्या आई श्रीमती.शेवंताबाई शंकर कदम माहूर यांनी बांधकाम परवाना मिळावा या करीता नगर पंचायत कार्यालयात संचिका सादर केलेली असता त्या संचिके मध्ये उनिवा असल्यामुळे ऊनिवाची पुर्तता करण्याकरीता त्यांना नगर पंचायत कार्यालयाकडून पत्र देण्यात आले आहे परंतु त्यांनी अद्याप पर्यंत उनिवाची पुर्तता केलेली नासताना त्याच कागदपत्रावर बांधकाम परवानगी दयावी माझी पत्नी नगरसेविका असतांना सुध्दा आम्हाला बांधकाम परवानगी दिल्या जात नाही अशा प्रकारे उध्दटपणे बोलने तसेच नगरपंचायत सदस्य म्हणुन करावयाच्या कामकाजात सुध्दा कार्यालयात नेहमी येवून कर्मच्यार्‍यांना कामे सांगणे व कर्मच्या – यांना दमदाटी करुन एका – एकाने दमदाटी करणे व छोटया – छोटया कारणावरुन कर्मच्या – यांना एका एकाने सगळयावर अॅट्रॉसिटी करतो , एका – एकाची बघतो अशा प्रकारच्या धमक्या नेहमी देत असल्यामुळे आम्ही कर्मचारी भयभीत झालेलो आहोत व यामुळे आमचे कामामध्ये लक्ष लागत नाही तरी सौ.ज्योतीताई विनोद कदम , नगरसेविका यांचे पती कदम यांना नगर पंचायत माहूरच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कसला ही कायदेशिर अधिकार नसतांना यांच्याकडून वारंवार वरील प्रकार घडत आहे . यांच्या विरुध्द योग्यती कार्यवाही करुन यांना नगर पंचायत कार्यालयात येण्यास व कामकाजात हस्तक्षेप करण्यास पाबंद करण्यात यावे . व यांच्या कडून नेहमी येणा – या धमक्या पासुन कर्मच्या – यांना संरक्षण देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य नगर परिषद , नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातुन आंदोलन करावे लागेल असा इशारा संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी यांनी निवेदनाद्वारे दिला असल्याने या वर मुख्याधिकारी काय कार्यवाही करतील या कडे कर्मचारी यांचे लक्ष लागले असुन या निवेदनावर संघटनेचे कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी,नगर अभियंता प्रतिक नाईक, सुनील वाघ, गंगाधर दळवे, देविदास जोंधळे, विशाल ढोरे, कु.प्रणाली मुजमुले, गणेश जाधव, शेख मजहर, नइम पाशा, अनिल खडसे, शकीलाबी शेख, ज्योतिबा खडसे, प्रदीप राठोड, जीवन खडसे, रवी पाईकराव, इंदल राठोड ,कृष्णा चव्हाण, अविनाश रुणवाल, बंडू राठोड, रवी आडे, शेख सादिक प्रवीण शेंडे, आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.