Home जळगाव केंद्र सरकारच्या कुषी धोरण कायदा विरोधात रावेर काँग्रेस – राष्ट्रवादीकडून निषेध…

केंद्र सरकारच्या कुषी धोरण कायदा विरोधात रावेर काँग्रेस – राष्ट्रवादीकडून निषेध…

111
0

रावेर (शरीफ शेख)

देशात केंद्र सरकारच्या विरोधात शेतीविषयक धोरणांला तीव्र विरोध व धिक्कार करण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे पाठिंबा दिला. केंद्र सरकारने कुषी कायदा रद्द करावा, हा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, तसेच देशात महागाई वाढत आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस, यांची दरवाढ त्वरित कमी करावी, देशात अराजकता वाढली आहे, देशात गेल्या १२० दिवसांपासून दिल्ली सिमेवर शेतक-यांचे सुरू असलेले आंदोलनांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी आज केंद्र सरकारच्या विरोधात आणि शेतकरी आंदोलनास काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुर्णपणे पाठिंबा आहे, असे निवेदन रावेर नायब तहसीलदार श्री पवार यांना देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कार्याध्यक्ष विलास ताठे, दिलरुबाब तडवी, प्रकाश सुरदास, गफूर तडवी,शे मेहमूद मण्यार, रामदास लहासे, सुर्य भान चौधरी, योगेश पाटील, संरपच मुंजलवाडी, निसार हाजी, गुलशेर तडवी, बिसन सपकाळ, शिवदास पाटील, भुपेश जाधव, शांताराम पाटील, इमरान पहेलवान, निसार कुरेशी सह अनेक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.