Home जळगाव रेमडीसीवर चा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका –  मानियार बिरादरी...

रेमडीसीवर चा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका –  मानियार बिरादरी ची तक्रार

115
0

रावेर(शरीफ शेख)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय व निमशासकीयरेमडीसीवर चा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका –  मानियार बिरादरी ची तक्रार रुग्णालयात तसेच खाजगी covid-19 हॉस्पिटल मध्ये बेड फुल झाल्याने त्याचा गैरफायदा हे काही खाजगी दवाखाने, मेडिकल स्टोअर व पॅथॉलॉजी लॅबोरेटरी घेत असल्याची तक्रार जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट आय एम ए चे सचिव डॉक्टर स्नेहल फेगडे यांच्याकडे केलेली आहे.

*रेमडेसीवरचा व रक्त तपासणी चा काळाबाजार*

जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी २२ मार्च च्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईड लाईन जारी केले असून त्यानुसार ज्या रुग्णांचे मूल्यमापन सिटीस्कॅन मध्ये आठ ते पंधरा त्रिवतेचे आढळल्यास त्या रुग्णांना रेमडेसीवर इंजेक्शन देण्यात यावे व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन करावे अशी गाईडलाईन असल्याने जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टोअर हे रेमडीसिवर चा काळाबाजार करत आहे.वास्तविक पाहता केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी असोसिएशन तर्फे घोषित केले आहे की १२००/- रुपयाच्या वर कोणीही विकणार नाही.तरी काळाबाजार सुरू आहे.

बिरादालरीचे आव्हान

मुस्लिम मानियार बिरादरी ने डे नाईट मेडिकल स्टोअर, के परविन मेडिकल स्टोअर व सुनील मेडिकल येथे बिरादरीचे कूपन दिल्यास ११००/- रुपयांमध्ये रेमडेसीवर इंजेक्शन दिले जात आहे.
तरी रुग्णांनी मन्यार बिरादरीचे कुपन प्राप्त करून उपरोक्त तिन्ही मेडिकल स्टोअर मधून अकराशे रुपयात रेमेडी सिवर इंजेक्शन विकत घ्यावे.

पॅथॉलॉजी लॅब चा सुद्धा काळाबाजार

मानियार बिरादरी ने कोवीड प्रोफाइल द्वारे आवश्यक त्या सर्व रक्त तपासण्या फक्त १३०० रुपयांमध्ये निपूण पॅथॉलॉजी येथे उपलब्ध करून दिल्या असल्या तरी काही खाजगी दवाखाने आपल्या दवाखान्यात ॲडमिट असलेल्या रुग्णांना त्यांच्या लॅबमधून अथवा त्यांच्या संबंधीत लॅब मधूनच रक्त तपासणी चा आग्रह व सक्ती करीत असल्याचे दिसून आले असून त्या ठिकाणी त्यांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे.
*बिरादरीने ‘त्या’ खाजगी दवाखान्यात जाऊन रक्त संकलित केले*
जळगाव शहर लगत असलेल्या खाजगी दवाखान्यात रक्त तपासणी सक्तीची होत असून ४ ते ५ हजार रु लागत आहे म्हणून आपण येऊन रक्त घ्या व तपासून आणून द्या अशी आर्त हाक एका धरणगाव येथील ऍडमिट असलेल्या महिलेने फारूक शेख यांना सकाळी दूरध्वनी द्वारे केली असता त्वरित टेकनेशीयन सैयद काझीम यांना घेऊन ते रक्त संकलित करून निपुण लॅब मधून डॉ राहुल मयूर यांनी फक्त १३००/- रु तपासून दिला. त्या बहिणी च्या चेहऱ्यावरील आनंद बघून बिरादरी चे फारूक शेख यांना सुध्दा आनंद झाला

*जिल्हाधिकारी व आय एम ए कडे लेखी तक्रार*

रेमडेसीवर व रक्त तपासणीचा काळा बाजाराबाबत तसेच खाजगी कोविंड हॉस्पिटल आकारीत असलेले अवास्तव बाबत बिरादरी ने जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली असून २५ खाजगी कोवीड हॉस्पिटल येथे सुरू असलेली रुग्णांची लूट थांबवावी, व ऑडिटर कडून तपासणी करावी अशी मागणी केली आहे. सदर गैर प्रकार न थांबल्यास बिरादरी त्रिव स्वरूपाचे आंदोलन करेल वा संबंधितांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल असे सुद्धा पत्रकात नमूद आहे.