Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण पॉझेटिव्ह तर 286 जण कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण पॉझेटिव्ह तर 286 जण कोरोनामुक्त

180
0

 

   यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75, 78, 62, 71 वर्षीय पुरुष आणि 60, 65 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिला, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 62 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.23) पॉजिटिव आलेल्या 556 जणांमध्ये 393 पुरुष आणि 163 महिला आहेत. यात यवतमाळातील 234, राळेगाव 59, दारव्हा 53, उमरखेड 40, दिग्रस 39, पांढरकवडा 39, पुसद 29, कळंब 23, नेर 13, वणी 6, बाभुळगाव 6, घाटंजी 5, आर्णि 3, मारेगाव 2, झरीजामणी 2 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहे.

            मंगळवारी एकूण 5404 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4848 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2225 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 25396 झाली आहे. 24 तासात 286 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 22588 आहे. तर जिल्ह्यात एकूण 583 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 239703 नमुने पाठविले असून यापैकी 228470 प्राप्त तर 11233 अप्राप्त आहेत. तसेच 203074 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.