Home नांदेड बेरोजगार दिव्यांगाणी अर्थमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची केली होळी…

बेरोजगार दिव्यांगाणी अर्थमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची केली होळी…

310

संतोष भद्रे

नांदेड – कोरोना या संसर्गामुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील 20 लाखाच्यावर संख्या असलेल्या दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी अर्थसंकल्प नात तरतूद न ठेवल्यामुळे तसेच वाढती बेरोजगारी सह गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रखडलेल्या निराधार मानधनासाठी ही अद्याप निधी उपलब्ध करून दिला नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडून दिनांक 22 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे राज्याच्या अर्थसंकल्पाची होळी करत आपला रोष व्यक्त केला आहे. या दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्याकडील अर्थमंत्र्याचा प्रतीकात्मक पुतळा ताब्यात घेताच दिव्यांगा कडून अर्थमंत्र्यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसर दणाणून काढला काढला त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री यांना एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की एवढ्यावरच शासन स्तरावरून अर्थसंकल्पात सुधारणा करून दिव्यांगासाठी भरीव तरतूद न ठेवल्यास लवकरच यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.आणि या सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आजच्या या आक्रमक होळी दहन आंदोलनात राहुल साळवेसह.प्रदीप गुबरे, विष्णू जायभाये, फिरोज खान हातगावकर ,अमरदीप गोधने, नागनाथ कामजळके, कार्तिक भारतीपुरम, प्रशांत पळसकर, शेषराव वाघमारे, विठ्ठल सूर्यवंशी, संजय दुलधाणे, रवी कोकरे ,आनंदा माने, संतोष गजलवाढ, सिताराम साळवे प्रदीप हानवते शिंदे नारायण विश्वंभर दळवे ,राजू इरबतीन, प्रशांत हनुमंते ,हाणमंतराव राऊत, संजय सोनुले, मधुकर वाघमारे, सय्यद तारीफ, जयपाल आडे, सय्यद अफरोज ,विठ्ठल डोंगरे, शेख अलीम, कोंडीबा कदम, किरणकुमार न्यायालापाली, नागोराव साळुंखे, संदीप पवार, बाबुराव वानोळे,काशिनाथ ढगे, भाऊसाहेब टोकलवाड, धोंडीबा कांबळे, मधुकर वाघमारे, लक्ष्मण मामिडवार, शंकर गिमेकर,विनोद रत्नपारखे, शेख अलीम , राजेश्वर मामिडवार, सुरेश वाघमारे, सरजा दिलावर, कमलाबाई आखाडे आणि सविता गवते यांच्यासह असंख्य दिव्यांग सहभागी झाले होते.