Home विदर्भ एफ एम. सी कंपनी कडून चांदोरी तालुका लाखणी येथे एफ.एम.सी प्राईवेट कंपनी...

एफ एम. सी कंपनी कडून चांदोरी तालुका लाखणी येथे एफ.एम.सी प्राईवेट कंपनी तर्फे जागतिक पाणी दिवस महिला भगिनिन सोबत साजरा करण्यात आला

148
0

भंडारा / लाखणी  , (प्रतिनिधी) – सर्व प्रथम एफ. एम. सी कंपनीच्या वतीने राज्य सरकारचे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून गावातील महिला भगिनींना पाण्याच्या योग्य वापर बद्दल जागरुक करण्यात आले की पाणी हे जीवन आहे.पाणी वाचविणे आज काळाची गरज आहे.

तसेच पाण्याचा सदुपयोग करणे सुद्धा गरजेचे आहे.आणि यात महत्वाचा वाटा महिला भगिनीचा आहे.तसेच शेतीसाठी सुद्धा पाण्याची तेवढीच गरज आपल्याला असते. उत्पादन वाढीच्या दृष्टीने पाणी किती महत्वाचे आहे. या बाबत संपूर्ण मार्गदर्शन एफ. एम. सी कंपनीचे एरिया मार्केटिंग मॅनेजर .हिरामण मंडल यांनी केले या कार्यक्रमात गावातील सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील तसेच महिला गटाच्या मुख्य सौ.आम्रपाली मेश्रे या उपस्थित होत्या.