Home महाराष्ट्र १० वी आणि १२ वी च्या परीक्षा संदर्भात शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा संदर्भात शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

392
0

 राजेश एन भांगे

दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबातची मोठी घोषणा केली आहे.

10 वी, 12 वीची परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

त्याचबरोबर 10 वी, 12 वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी 30 मिनिटे वाढवून मिळणार आहे.

*शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या* :

● 10 वी, 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे.

● विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देता येणार आहे.

● त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरता येतील.

● दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होणार आहे.

● बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे.

● लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे.

● 22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.

● विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा होणार आहे.

● मुलांना पेपर लिहीण्यासाठी जास्त वेळ देण्यात येणार आहे.

● 40 ते 50 मार्कांच्या पेपरसाठी 15 मिनिटं जास्त वेळ देण्यात येणार आहे.

● विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे. तर पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल.

● दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी 1 तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येणार आहे.