Home राष्ट्रीय अन् व्हॉट्सॲप झाले बंद…!

अन् व्हॉट्सॲप झाले बंद…!

398
0

सर्व्हरडाऊन झाले कशे अजूनही कल्पना कळाली नाही..

 

यवतमाळ : जगभरातील वापरकर्त्यांसाठी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक मेसेंजरचे सर्वर मागील काही वेळेत डाऊन झाले असून यामुळे एकच खळबळ उडाली.
हे सर्व अ‍ॅप्स हे फेसबुक कंपनीचा भाग आहेत आणि सामायिक तंत्रज्ञान सामायिक करतात. जगभारातील वापरकर्त्यांना हे अ‍ॅप उघडल्यावर संदेश पाठविण्यात किंवा प्राप्त करण्यात त्रुटीं जाणवत होत्या. मात्र तांत्रिक अडचणींबाबतीत कंपनीकडून अधिकृत अशी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नव्हती.
जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले होते. सर्व्हर बंद पडल्यामुळे व्हॉट्सअ‌ॅपवरच्या सगळ्या सुविधा बंद पडल्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ग्रूप व्हिडीओ कॉल ही सर्व फिचर्स बंद पडली. हा प्रकार आज रात्री 11 च्या सुमारास समोर आल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड काही क्षणांत सुरु झाला आहे. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.