Home मराठवाडा प्रियसीच्या घरातच शिवसेना नेत्याची  गळफास घेऊन आत्महत्या ,

प्रियसीच्या घरातच शिवसेना नेत्याची  गळफास घेऊन आत्महत्या ,

626
0

प्रियसीच्या घरातच शिवसेना नेत्याची  गळफास घेऊन आत्महत्या ,

 

 

अमीन शाह ,

औरंगाबाद

प्रेसीच्या घरात जाऊन शिवसैनिकाने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना , गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात घडली . सुनील प्रकाश खजिनदार असे आत्महत्या केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव असून , प्रेमसंबंधातील भांडणातून हे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा होती . शिवसेनेचे पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांचे दौलताबाद परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते . ते त्या महिलेच्या घरी नेहमी ये – जा करीत असत , काही दिवसांपूर्वी खजिनदार यांचे लग्न जमले . हि माहिती त्यांच्या प्रियसीला कळली , मंगळवारी खजिनदार नेहमी प्रमाणे तिच्या घरी गेले . प्रियसीने त्यांना लाग्नासंदार्भात विचारणा केली , त्यावरून दोघात वाद झाला .प्रेयसीला खजिनदार यांनी कुणाशीही लग्न करणे मान्य नसल्याने , परंतु त्यांचे लग्न जुळलेले असल्याचे त्यांनी तिला सांगितले या वरुन दोघात खडाजंगी झाली त्यानंतर खजिनदार यांनी तिच्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली . दरम्यान , गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह घाटीत नेण्यात आला . डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले . शुक्रवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले . त्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेत महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली . यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील पोलीस ठाण्यात पहोचले होते . दरम्यान या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे . या आत्महत्ये मुळे परिसरात दुःख वयकत केले जात आहे ,