Home मराठवाडा “आग ही आग” ‘  यशवंत सूतगिरणीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान

“आग ही आग” ‘  यशवंत सूतगिरणीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान

333
0

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील यशवंत सहकारी सुतगिरणी लि.अंबड येथे सुतगिरणी साईटवर दि.१६ रोजी सकाळी ६-३० वाजता युनिट १ येथे आग लागली होती.

त्या नंतर‌सुतगिरणी प्रशासनाने सुतगिरणीची अग्निशमन यंत्रणा तसेच समर्थ सहकारी साखर कारखाना लि.अंबड चे अग्निशमन बंब ब मार्केट कमीटी व नगर परिषद गेवराई तसेच नगर परिषद जालना येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आलेली आहे.सूतगिरणीस लागलेल्या आगी संदर्भात सूतगिरणीचे कार्यकारी संचालक पी.आर.चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता,आगीमध्ये सूतगिरणीचे एकूण अंदाजे ३ ते ४ कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

सुतगिरणीस आग लागल्यानंतर अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सूतगिरणी साईटवर भेट देऊन आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली.सूतगिरणीस आग लागून झालेल्या नुकसानी बाबत सूतगिरणी प्रशासनाने पोलिस अधिकारी अंबड तसेच वरिष्ठ मंडळ प्रबंधक, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. औरंगाबाद यांना नुकसान पाहणी करण्यासाठी कळविलेले आहे.