Home नांदेड गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट एँटिजेन तपासणी , मास्क न वापरणाऱ्या कडून दंड...

गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट एँटिजेन तपासणी , मास्क न वापरणाऱ्या कडून दंड वसूल.

233
0

मजहर शेख

नांदेड / किनवट  , दि. १७. – सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच.पुजार,भाप्रसे यांच्या आदेशान्वये गोकुंदा ग्राम पंचायत अंतर्गत गर्दीच्या ठिकाणी तहसिलदार उत्तम कागणे व गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, ग्राम विकास अधिकारी अशोक चव्हाण, पोलिस काँस्टेबल समियोद्दीन कुरेशी, आदींच्या पथकाने मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. यावेळी उपसरपंच शेख सलीम हेही पथकासमवेत रस्त्यावर उतरुन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आवेशान्वये सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट एँटिजेन टेस्ट घेण्यासाठी वैघकीय पथक गठीत केले आहे. मंगळवार (दि.१६) रोजी किनवट शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे गर्दीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. यावेळी काही अहवाल बाधित आढळले. त्यांना उपचारार्थ कोविड हेल्थ केअर सेंटरला संदर्भसेवेसाठी दाखल केले.
बुधवार (दि. १७ ) हेच पथक गोकुंदा येथे दाखल झाले. हॉटेल, कम्प्युटरक्लास, हेअर सलून, भाजीपाला व किराणा दुकान येथे प्रत्यक्ष जाऊन एँटिजेन टेस्ट घेतल्या. मास्क नसणाराकडून दंडही वसूल केला. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, साबणाने स्वच्छ हातधुणे व शारीरिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रिचा वापर करावा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.