Home जळगाव शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद(शेकू बावा) यांनी सपाच्या जिल्हा निरीक्षकपदी निवड

शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद(शेकू बावा) यांनी सपाच्या जिल्हा निरीक्षकपदी निवड

270
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव येथील रहिवासी शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद (शेकू बावा)यांची समाजवादी पक्षाच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून याबाबत निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी शेख मोईनुद्दीन यांना जळगाव जिल्हा व शहरचे निरीक्षक म्हणून नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीच्या अंतर्गत शहरात संघटन वाढविणे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून पक्षाची ओळख वाढविणे आदी कार्य सोपविले आहे.त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.