Home नांदेड मुस्लीम समाजाचे धार्मीक भावना दुखवल्याबद्दल वसीम रिजवी वर गुन्हा दाखल करा.

मुस्लीम समाजाचे धार्मीक भावना दुखवल्याबद्दल वसीम रिजवी वर गुन्हा दाखल करा.

572
0

मजहर शेख

 

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम , रिजवी वर कारवाई करण्याची मागणी…!

नांदेड/माहूर,दि:१६:- मुस्लीम लोकांचे धार्मीक भावना दुखवल्या बद्दल माहूर पोलिस स्टेशन ला तक्रार व निवेदन दाखल करण्यात आली तक्रारीत वजा अर्ज मध्ये असे आहे की , वसीम रिजवी नामक एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने कुरआन- ए – पाक संबंधी आपत्तीजनक भाष्य करुन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत . तसेच धार्मीक ग्रंथ कुराण मधील २६ आयते काढून टाकण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात पी.आय.एल. सुध्दा दाखल केलेली आहे . यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून हा आमच्या धार्मीक ग्रंथाचा अवमान देखील आहे . वसीम रिजवीच्या या कृती विरोधात सर्व स्तरावर संताप व्यक्त होत असून अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला समाजात राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही . असे निवेदनाद्वारे माहूर पोलीस निरीक्षक यांना विनंती केलि की , वसीम रिजवी विरुध्द समाज भावना दुखावल्या बद्दल आणि धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्याबद्दल विविध कलमान्वेय ताबडतोब गुन्हा दाखल करावा असे मागणी करण्यात आली.या निवेदनावर एलियास बावानी,आजीम सय्यद,निसार कुरेशी ,करीम शाह,काझी सय्यद सलमान सह आदि च्या सह्या आहेत.