Home जळगाव जोडीदाराची कुंडली बघण्यापेक्षा स्वभाव, गुण व योग्यता बघा – प्रांताधिकारी कैलास कडलग

जोडीदाराची कुंडली बघण्यापेक्षा स्वभाव, गुण व योग्यता बघा – प्रांताधिकारी कैलास कडलग

99
0

रावेरला रेशीमबंध वधु-वर सुची २०२०-२१ चेप्रकाशन

रावेर (शरीफ शेख)

जोडीदार बघतांना कुंडली बघण्यापेक्षा स्वभाव,गुण व योग्यता बघावी निव्वळ सुंदरता व पैसाही बघू नये असे प्रतिपादन फैझपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी रावेर येथे आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

लग्नासाठी जोडीदार बघतांना कुंडली, सुंदरता व पैसा बघण्यापेक्षा स्वभाव, गुण व योग्यता बघावी तसेच लग्नात अनाठाई खर्च टाळावा, अनाठाई खर्च केल्याने आपण कर्जबाजारी होतो व व्यापारी श्रीमंत होतात. आपण आपल्याच समाजबांधवांकडूनच गरजेच्या वस्तू खरेदी कराव्यात. असे प्रतिपादन फैझपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले. रावेर तालुका मराठा समाज वधु-वर परिचय व सामुदायिक विवाह समिती तर्फे आयोजित रेशीमबंध वधु-वर सुची २०२०-२१ च्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याने त्यादृष्टीने समुपदेशन होणे गरजेचेअसल्याचेही ते म्हणाले.

यंदा कोरोना संसर्ग असल्याने सर्व कार्यक्रमांनाबंदी असल्याने दरवर्षी होणारा रावेर तालुका मराठा समाज वधु-वर परिचय व सामुदायिक विवाह समिती तर्फे आयोजित वधु-वर परिचय सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे फक्त मोजक्याच ३० लोकांच्या उपस्थितीत सर्व कोरोना नियमांचे पालन करत रेशीमबंध वधु-वर सुची २०२०-२१ चे प्रकाशन आज दि. ११ रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर फैझपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार, रावेरच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल पाटील, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील, माजी आमदार अरुण दादा पाटील, उद्योजक श्रीराम पाटिल, प्रा. गोपाल दर्जी, रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळचे अध्यक्ष राहुल पंडित, डॉ. सुरेश पाटील उपस्थितहोते.

रावेर तालुका मराठा समाज वधु-वर परिचय व सामुदायिकविवाह समिती तर्फे सुरु असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून विवाह इच्छुकांनी रेशीम बंध या पुस्तिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावलचे तहसीलदार महेश पवार आपल्या मनोगतात म्हणाले कि, सामुहिक विवाह करणे योग्यच असून यामुळे अनाठाई खर्च कमी होतो. तसेच या पुस्तिकेमुळे बाहेरगावी राहणा-या समाज बांधवांना वधु-वरांची माहिती मिळते.

रेशीमबंध २०२०-२१ पुस्तिकेत ८५ युवक ५८ युवती यांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे. यावेळी वामनराव पाटील, कडू पाटील, दत्ता पाटील,संतोष पाटील, सोपान पाटील, सी.एस. पाटील सर, ललित चौधरी सर, वाय.एस. महाजन सर, येवले सर, आर.बी. महाजन सर, बी.डीपाटील सर, पं.स.सदस्य योगेश पाटील, योगेश महाजन, राजेश महाजन, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक पी.आर. पाटील सर यांनी सूत्रसंचालन जे.के. पाटिल सर यांनी तर आभार घनश्याम पाटील यांनी मानले.