Home विदर्भ जागतिक महिला दिनी विशेष आरोग्य शिबिर संपन्न

जागतिक महिला दिनी विशेष आरोग्य शिबिर संपन्न

179
0

यवतमाळ / कळंब  – आज महिला दिन रोजी निर्मिती उपजीविका केअर,चापरडा येथे विशेष आरोग्य शिबिर संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटक माजी सरपंचा सरलताई खंडाते,प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.संजय सांबजवार सर,मा.डॉ.बाबा कपिले,मा.डॉ.रंजनकुमार विश्वास,नर्मदाताई खडकी हे होते,शिबिराचे उदघाटन खंडाते ताई यांकडून झाल्यावर सत्कार समारंभ हा हनी(सहद)जो महिला गटाच्या 7 वेळा राज्यस्तरावर पुरस्कृत असलेले प्रत्येकी भेट देण्यात आले…शिबीर हे “योग व सत्वचिकित्सक समिती,यवतमाळ,आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार समिती,नवी दिल्ली,आयुष डॉक्टर अँड पॅरामेडिकल असो.दिल्ली,निर्मिती उपजीविका केअर”च्या अंतर्गत घेण्यात आले…दरम्यान,महिला ही समाजाची मेरुदंड आहे,महिलांना आदिशक्ती चा दर्जा दिला जातो,परंतु आजच्या युगात महिलांची परिस्थिती ही घरच्या चुली पासून दरवाज्या पर्यंत राहिला पाहिजे हा समाज बाळगणारे व्यक्तींचे विचार आजच्या महिलांनी धुडकावून लावले आहेत…आज पॅसेंजर विमान महिलांनी तब्बल 16000km कोणत्याही अडथड्या शिवाय आणि कोणताही ब्रेक न घेता पार पडले,योग परिषद द्वारे जास्तीत जास्त विश्वविक्रम करणाऱ्या मध्ये महिलांनी बाजी मारली,एकीकडे मुलांचे व्यसनाकडे ज्या गतीने वाटचाल आहे त्याच गतीने महिला शिक्षणात प्रगती करीत आहे असे हे विश्वविक्रम करण्यातही महिला मागे नाहीत,आज वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे..असे प्रतिपादन डॉ.बाबा कपिले साहेबांनी केले,डॉ.सांबजवार साहेब म्हणतात की,ज्या महिला जंगलात जाऊन जंगली जनावरांच्या भीतीला बळी न पडता धाडसी वृत्तीने जंगलातील सहद गोळा करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकवतात त्या महिला कोणतेही संकट सहज रीतीने पार करू शकतात अश्या शब्दात स्तुती केली व पुढील कार्यासाठी लाख शुभेच्छा दिल्यात,डॉ.विश्वास साहेब म्हणतात की,योग-निसर्गोपचार विशुद्ध अयुर्वेदद्वारे जीवनशक्ती वाढवा,विविध जीर्णरोग निर्मूलन स्वस्थ स्वावलंबन करणे तसेच समिती द्वारे दर गुरुवारी यवतमाळ व चापरडा येथे मार्गदर्शन,निदान व उपचार शिबीर यांची निरंतर सेवा देण्यात येईल व महिलांच्या आरोग्याविषयी विशेष चिकित्सा देण्यात येईल…शिबिर दरम्यान,COVID-19 चे सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आले,शिबिरासाठी निर्मिती लघुउद्योग संघ,चापरडा,निर्मिती उपजीविका केअर यांनी घेतले,शिबिर डॉ.विश्वास साहेबांनी”मूळव्याध, भगंदर, फिशर,हायड्रोसील”यांमध्ये सेवा दिली तर डॉ.विवेक चौधरी यांनी”सायटिका, स्पॉंडीलायटीस, वात-संधिवात, जॉइंट रिप्लेसमेंट टाळणे,PCOD/PCOS”यांमध्ये सेवा दिली,आभार प्रदर्शन निर्मिती उपजीविका केअर चे संचालक मा.राजेंद्रकुमार दुधकोर यांनी केले…