Home मराठवाडा मराठा आमदारांनी आरक्षण मिळेपर्यंत राजीनामे दिले तर समाज चार पिढ्या निवडून देईल...

मराठा आमदारांनी आरक्षण मिळेपर्यंत राजीनामे दिले तर समाज चार पिढ्या निवडून देईल – नरेंद्र पाटील

349
0

 जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे आज आक्रोश मेळावा पार पडला, यावेळी मोठी घोषणा करण्यात आली असून १६ मार्चला आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार आहे, मा. शरदजी पवार साहेब यांनाच आता गळ घातली जाणार आहे कि, मा. पवार साहेबांनी दोन्ही सरकारला मराठा समाजासाठी विनंती करून, समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मोठी घोषणा साष्टपिंपळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मा. नरेंद्रजी पाटिल यांनी सर्व मराठा आमदारांना खुले आवाहन केले असून ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आमदारांनी आप आपले राजीनामे द्यावेत, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आरक्षण आंदोलन लढा लढला जाईल असे ठरवावे आणि मग मराठा समाज तुम्हाला चार पिढ्या निवडून देईल असे आवाहन त्यांनी केले आहे.

तुमचे रक्त जर मराठ्यांचे असेल तर तुम्ही मराठा आरक्षणासाठी सज्ज व्हाल, नसता तुमचे भविष्य पण आम्ही अंधारमय केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, या सरकारने सारथी संस्था बंद पाडली, आण्णासाहेब विकास महामंडळ बरखास्त केले, आरक्षणाच्या कोर्टातील तारखा वाढवून घेतल्या जातात, आरक्षण मिळवण्यासाठी भक्कमपणे पुरावे सादर केले जात नाहीत, साष्टपिंपळगाव आंदोलकांची दखल घेतली जात नाही असे घणाघाती आरोप नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

साष्टपिंपळगाव ते बारामती “आरक्षण आक्रोश विनंती रॅली” काढण्यात येणार आहे असे पुढे मनोज जरांगे पाटिल म्हणाले कि, १५ वर्षांपासून मी ऐकतो आहे की, मा. शरदचंद्रजी पवार साहेब मराठा समाजाकडे लक्ष देत नाहीत आणि जर मा. शरदचंद्रजी पवार म्हणाले तर आरक्षण हे नक्की मिळू शकते असे दैनंदिन जीवनात लोक बोलत असतात म्हणून आता मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनाच आता “आरक्षण आक्रोश विनंती रॅली” काढून यात सहभागी होण्यासाठी साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने गळ घातली जाणार आहे, मराठा समाजाचे देशातील सर्वात मोठी नेते शरदजी पवार साहेब आहेत, ते हि विनंती मान्य करतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देतील आणि जर मा. पवार साहेबांनी मराठा समाजाच्या तरूणांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम केले नाही तर पुढिल काळात समाज मा. पवार साहेबांच्या विरूध्द दिशेने वाटचाल करेल, परंतु मा. पवार साहेबांनी मराठा समाजाच्या हाकेला हाक देवून आरक्षणासाठी पुढाकार घेऊन, मराठा तरूणांच्या डोक्यावर हात ठेवून, मराठा तरूणांना न्याय मिळवून द्यावा आणि तरूणांचा आक्रोश व वेदना थांबवाव्यात आणि मराठा समाजाचा आशिर्वाद घ्यावा, असे सांगितले.

यावेळी उपस्थित मा. नरेंद्रजी पाटील, भारतीताई कटारे, वैष्णवी जाधव, कार्तिकी जाधव, भक्ती तांबडे, गीता तांबडे, प्रणाली औटी, दिदी देशमुख, अंकुश कदम मुंबई, विनोद साबळे रायगड, विजय काकडे, गंगाधर काळकुटे, बाबा तिपटे, गोरख शिंदे, गणेश शिंदे, आप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, आर.आर. येवले, दिव्या पाटिल आदी राज्य समन्वयक उपस्थित होते आणि हजारोंच्या संख्येने प्रचंड जनसमुदाय या आक्रोश मेळाव्यासाठी उपस्थित होता.