Home विदर्भ पिपरी बेडा येथे विदयुत शॉटसर्केट मुळे शेतातील उभी ज्वारी राख

पिपरी बेडा येथे विदयुत शॉटसर्केट मुळे शेतातील उभी ज्वारी राख

237

वार्ताहर येरला

वर्धा :- स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेडा येथील शेतकरी पोतूरकर श्यामा चव्हाण यांच्या शेतात त्यांनी ज्वारी ची पेरणी केली होती. पण आता ज्वारी चे पीक हातात येत असताना विजेच्या शॉटसर्केट मुळे शेतातील उभी ज्वारी जाळून राख झाली. यामुळे शेतकऱ्यां समोर उभ पीक गेल्यामुळे परिवाराला चालविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहेत. यावर्षी सुरुवातीपासून सोयाबीन, कापूस आणि तूर, चणा हे पीका मध्ये 90 नुकसान झाले. पण शासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष केले कोणत्याही शेतकऱ्याला नुकसाची कोणतीही मदत दिली नाही म्हूणन या कशीही ज्वारी ची पेरणी केली ते पण आता निसर्गाला नाही पटली.एकूण 20 ते 25 टन ज्वारी, बैलाचा चारा आणि शेती उपयोगी पाईप जाळून राख झाल्यामुळे या कोरोना काळात शेतकऱ्यांच्या समोर जीवन कस जगावे हा प्रश्न निर्माण झाला. या वर्षी बैलाला चारा सुद्धा नाही झाला कसही करून ज्वारीचे पीक हाती आल्यावर बैलाला पण चारा होईल असे वाटत होते पण आता काळाने याही पिकावर घात केला. एकूण 2.5 लाखाचे मोठे नुसकान झाले असून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.