Home विदर्भ जागतिक महिला दिनानिमित्त ४५ वर्षावरील सर्व महिलांनी करून घ्यावे करोना लसीकरण –...

जागतिक महिला दिनानिमित्त ४५ वर्षावरील सर्व महिलांनी करून घ्यावे करोना लसीकरण – डॉ सौ कालिंदी राणे.

109
0

रवींद्र साखरे आर्वी 

वर्धा –  आर्वी येथील प्रसिध्द स्त्री रोग तझ डॉ सौ कालिंदी राणे यांनी समस्त माता, भगिनी व मैत्रीणींना तसेच सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा देत महिलांना कोरोना लसीकरणाचे आवाहन केले आहे.


राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वी येथे नुकतीच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लोकांचा उदंड असा प्रतिसाद या मोहीमेला मिळत आहे. राणे हॉस्पिटल हे वर्धा जिल्ह्यातील एकमेव खाजगी कोरोना लसीकरण केंद्र असून आता पर्यंत राणे हॉस्पिटल आर्वी येथे पाचशेहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे . आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून परीसरातील सर्व ४५ वर्षावरील माता व भगिनींनि या महिलादिनी कोरोनाची लस लावून हा महिला दिन साजरा करावा कारण निरोगी महिला हे निरोगी व आरोग्यदायी समाजाचे गमक आहे असे प्रतिपादन डॉ राणे यांनी केले . त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेला प्रतिसाद देऊन आपण आपले व आपल्या परिवारातील ४५ वर्ष्याच्या वरील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आर्वी येथील प्रसिध्द स्त्री रोग तझ व स्वतः सर्वाना लसीकरण करणाऱ्या डॉ सौ कालिंदी राणे यांनी केले आहे.