Home विदर्भ अवैध वाळू उपसा कसा थाबणार? रात्रिच्यावेळेस उत्खनन करुन नियम ठेवले धाब्यावर

अवैध वाळू उपसा कसा थाबणार? रात्रिच्यावेळेस उत्खनन करुन नियम ठेवले धाब्यावर

429

ईकबाल शेख

वर्धा जिल्यातील संयुक्त रेतीघाटावर शासनाच्या वाळूउपसा धोरणातील नियमांचा बोजवारा उडवला जात आहे. जेसीबी अन् पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने वाळू उपसा केला जात असताना महसूल प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव व ईतर सदर वाळू घाटावर शासनाने सुधारित शासन निर्णयानुसार वाळू उपसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परंतु या नियमाचा जिल्यातील संयुक्त रेती घाटावर बोजवारा उडाला असताना नियंत्रण ठेवणारे स्थानिक तहसील कार्यालय बेफिकीर आहे. या वाळू घाटांवर अवैधरित्या उत्खनन केले जात आहे.
वाळूचा जेसीबी व पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने उपसा केला जात आहे. नियमानुसार नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी, सक्शन पंपाचा वापर करता येत नसून शासनानी दिलेल्या आदेशानुसार खोलीपर्यंतच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. असे असताना या घाटांवर वाळू जेसीबी, पंपाच्या सहाय्याने मनमर्जी खोलीपर्यंत उपसा चालू आहे.

शासन नियम उघडपणे मोडीत काढून नदी पोखरण्याचा उद्योग चालू असताना काहि जागरुक नागरीकांनी तक्रारी करूनही नियंत्रण ठेवणार्‍या तहसीलदारांसह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.

परिणामी परिसरातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे. वाळू घाटाच्या तपासणी करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना जेसीबीने वाळू उपसा होत असल्याचे दिसत असतानाही महसूल यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही. यामुळेच वाळू तस्करीत अनेकांचे हात गुंतले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडुन होत आहे.

रात्री होतोय उपसा

वाळूची अवैधरित्या चोरी आणि विक्री करणाऱ्यांनी वाळू चोरण्यासाठी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेणे सुरू केले आहे. रात्रभर नदीपात्रातून वाळूची चोरी करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. परंतु, महसूल शाखा व पोलिसांचे देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

 

 

 

 

पोलिस,महसूल वाळू तस्कर यांची साखळीच 

वर्धा येथील नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून रात्री वाळूचा उपसा केला जातो. तर दिवसा वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.