Home विदर्भ गाझिपूर बाॅर्डरवर आंदोलकांच्या सेवार्थ शैलेश अग्रवाल यांचेकडून सेवा सप्ताहाचे आयोजन.

गाझिपूर बाॅर्डरवर आंदोलकांच्या सेवार्थ शैलेश अग्रवाल यांचेकडून सेवा सप्ताहाचे आयोजन.

228

ईकबाल शेख

वर्धा – केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देन्यासाठी व केंद्र शासनाचे शेतकरी आरक्षण प्रस्तावावर लक्षवेधन्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे आर्वी, हिंगणघाट व धामणगाव येथिल आंदोलक दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्र्यांचा घेराव करून गाझिपूर बाॅर्डरवर जावून आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात आंदोलन स्थळी पोहचून महाराष्ट्रातील हे शेतकरी गाझिपूर बाॅर्डरवर आंदोलकांच्या सेवार्थ जेवनाचे लंगर चालवित असून स्टाॅल लावून शीतपेय, दूध, नाश्ता व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.

लंगर व स्टाॅलचे व्यवस्थापन गजानन मानकर, गोविंदा नारनवरे, दयासागर पाटील, रवी चाफले, निखिल डेहनकर व दिनेश कामडी यांच्याकडे सोपविन्यात आले असून २५ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंत हा सेवा सप्ताह राबविण्यात येनार आहे.