Home मराठवाडा मोटार सायकली विहिरीत टाकून चोरटे पसार…

मोटार सायकली विहिरीत टाकून चोरटे पसार…

382

       घनसावंगी  – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलगाव शिवारातील गट नंबर ४६ मध्ये जिजा बाबुराव मोताळे यांच्या शेतातील विहिरीत दोन मोटारसायकली आढळून आल्या.

जिजा मोताळे यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता आपल्या विहिरीतील शेतपंप सुरू करून उसाच्या सऱ्यांना पाणी लावून दिले होते.शनिवारी सकाळी पहाटे चारच्या दरम्यान विहिरीत किती पाणी उपसले हे बघण्यासाठी ते गेले असता विहिरीत बॅटरी चमकावून बघितले असता त्यामध्ये दोन मोटारसायकली आढळून आल्या.                                                              सदरील घटना शेतकऱ्याने बेलगाव येथील पोलीस पाटील भानुदास मोताळे यांच्या कानावर घातली, पोलीस पाटील यांनी गोंदी पोलिस स्टेशनला संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली. बीट जमादार अंकुश दासर यांनी घटनास्थळी भेट देऊन  ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत आढळलेल्या दोन मोटरसायकली विहिरीच्या बाहेर काढल्या व रीतसर पंचनामा केला. या प्रसंगी पोलीस पाटील भानुदास मोताळे, शेतकरी जिजा मोताळे ,सुखापुरीचे पोलीस पाटील इलियास बागवान ,सूर्यकांत मोताळे, ज्ञानदेव  दातवासे, सुरेश लहुटे ,सुनील राखुंडे, विलास मोताळे, संपत मोताळे आदीजण उपस्थित होते .परिसरात या अगोदर चोरी गेलेल्या मोटरसायकलीमागे या चोरट्यांचा हात आहे का? या मोटारसायकलींचा मूळ मालक कोण याचाही  गोंदी पोलीस त्यादृष्टीने  तपास करीत आहेत.                                                                 पुढील तपास गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अंकुश दासर हे करीत आहेत.                                          छायाचित्रात अज्ञात चोरट्यांनी विहिरीत टाकून दिलेल्या मोटरसायकली दिसताहेत गोंदी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.