Home जळगाव इस्लामपूर स्टेट बँकेमध्ये दोन लाख रुपये चोरले

इस्लामपूर स्टेट बँकेमध्ये दोन लाख रुपये चोरले

19
0

अमळनेर: अमळनेर इस्लामपुरा स्टेट बँक शाखेत दोन मुखवटा घातलेल्या महिलांनी रेगज़ीन बॅगवर ब्लेडने मारुण दोन लाख रुपये चोरले. सविस्तर माहिती अशी की शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा कय्यूम अली शाह हे जळगाव बस डेपो मधील कर्मचारी आहे. शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपुरा स्टेट बँकेने आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी २ लाख रुपये बँकेतुन काढले आणि तिथे असलेल्या दोन संशयित महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्या. कय्यूम अली शाह आपली पासबुक अपडेट करण्यासाठी रांगेत उभे अस्ताना त्या संशयित महिला रांगेत मांगे उभे अस्ताना दिसत आहेत. दोन्ही मुखवटा घातलेल्या महिलाही त्याच्या मागोमाग आल्या आणि रेगज़ीन बॅगवर ब्लेडने मारुण दोन लाख रुपये काढून झाले रफूचक्कर झाले. या सर्व घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. आपली पास बुक अपडेट केल्यावर कय्यूम अली शाह यांनी ते पुस्तक आपल्या बॅगमध्ये ठेवले असता बॅंकातून दोन लाख रुपये चोरीला गेल्याचे आणि बॅग बाजूने फाटल्याचे दिसून आले. बँकेच्या मॅनेजरला विचारले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही मुखवटा घातलेल्या संशयित महिलानी ही चोरी केली आहे. कय्यूम अली शाह म्हणाले की दुपारपर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा वार्ताहर शहर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याशी संपर्क केला तर त्यानी सांगितले की विवेक शिवाजी पांडवी या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही मुखवटा घातलेल्या महिलांचा शोध सुरू असल्याचे सांगितले गेले.

Unlimited Reseller Hosting