Home विदर्भ रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी परिक्षार्थ्यांनी सहकार्य करावे.!

रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी परिक्षार्थ्यांनी सहकार्य करावे.!

41
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

शिक्षण विभागाची तयारी पूर्ण….

वर्धा , दि. १७ :- जिल्हयात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिक्षा 2019 साठी 19 जानेवारी ला एकुण आठ केंद्रावर दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीना प्रवेशपत्र 4 ते 19 जानेवारी पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले असून परीक्षेकरीता परीक्षार्थींनी एक तास आधी पोहोवून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षाणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. शहरातील न्यू आर्टस, कामर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, न्यु. इंग्लीश हायस्कुल ॲन्ड ज्यु. कॉलेज, लोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रगामी हायस्कुल, यशवंत महाविद्यालय व जानकीदेवी बजाज सायन्स कॉलेज या परीक्षा केद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजता पर्यंत व दुपारी 2 ते 4.30 वाजता दरम्यान घेण्यात आहे. परीक्षार्थ्यांना सकाळी 10.10 वाजता नंतर व दुपारी 1.40 नंतर परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षार्थीने मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजीटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे इलेक्ट्रानिक्स साहित्य तसेच पुस्तके, वहया कोणत्याही प्रकारची कागदपत्रे (प्रवेशपत्र व फोटो ओळखत्राशिवाय) परीक्षा केद्रावर आणू नयेत. असे साहित्य केंद्रावर किंवा परीक्षागृहात आणण्यास बाळगण्यास व वापरण्यास मनाई आहे. असे साहित्य बाळगल्याचे दिसून आल्यास ते गैरप्रकार करण्याच्या हेतुने जवळ बाळगले आहे असे गृहीत धरुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उत्तरपत्रिकेसह उत्तरपत्रिकेची दुसरी प्रत परीक्षार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या कामकाजाचे नियंत्रण करण्याकरीता शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालय, जिल्हा परिषद येथे जिल्हा परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. परीक्षेबाबत उमेदवाराच्या काही अडचणी असतील किंवा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र मिळाले नसल्यास त्यांनी परीक्षा नियंत्रण कक्षाच्या 07152 243597 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षेसाठी जिल्हा परिरक्षक, केंद्रनिहाय केंद्रसंचालक या व्यतिरिक्त झोनल अधिकारी व सहायक परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेत होणा-या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व केंद्रावरील कामकाजाचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी कळविले आहे.

Unlimited Reseller Hosting