Home विदर्भ आठवड्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता शेतकरी सतर्क राहावे – डॉ. यादगिरवार 

आठवड्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता शेतकरी सतर्क राहावे – डॉ. यादगिरवार 

295
0

देवानंद जाधव 

यवतमाळ – काही हवामान संस्थेच्या मतानुसार मध्य भारतातील विपरीत चक्रवाती मुळे दोन्हीकडील समुद्रातून आद्रता घेऊन येणारे वारे वाहू शकतात. आणि मध्य भारत विशेषत विदर्भात पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतकऱ्यांचे तूर आणि हरभरा काढणी सुरू आहेत. तर काहींचे कापणी अवस्थेत आहेत, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जागरूक राहून योग्य ती काळजी घ्यावी. हरभरा कापणीला आल्यास कापून ढीग करून व्यवस्थित झाकून घ्यावे अन्यथा पावसामुळे हरभरयाचे घाटे जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. आंबा बागेतील पडलेले मोहरी किंवा लहान आंबे उचलून नष्ट करावे जेणेकरून रोगांचे अवशेष त्याद्वारे नष्ट होईल व परत करपा येण्याचे प्रमाण कमी होईल. जर पाऊस आल्यास शेतकऱ्यांनी भाजी पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा करावी त्याआधी भाजीपाल्याची तोडणी करून घ्यावी व फवारणी केल्यानंतर किमान आठ दिवस तरी भाजीपाला तोडू नये.असे आवाहन मध्य विदर्भ विभाग चे सहयोगी संशोधन संचालक डॉ प्रमोद यादगीरवार यांनी केले आहे.