Home बुलडाणा दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी मारली ,

दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी मारली ,

231
0

 

 

खळबळजनक घटना

अमीन शाह

बुलडाणा

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे सकाळी साडे आठ ते ९ वाजेच्या दरम्यान गावाजवळील पिण्याच्या पाण्याची शासकिय विहीर आहे. या विहिरीमध्ये ३३ वर्षिय महिला आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीमध्ये उडी घेतली. हे देऊळगावराजाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाहिले. क्षणार्धात कोणताही विचार न करता गाडी रस्त्याच्या कडेला लावुन त्यांच्यासह इतर दोघे असे चौघांनी विहिरीमध्ये उडी घेत महिला व दोन लहान मुलांचे प्राण वाचवले.
देऊळगावराजा येथे बाजारासाठी जात असलेले वाकद ता.रिसोड, येथील रशीद करीम कुरेशी व सोनाटी बोरी येथील अनंता वामन चनखोरे या दोघांसह विजय राजणे,राम खंदारे, सागर देशमुख यांनी महिलेसह दोन लहान मुलांना वर काढुन शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आणले. यातील १ वर्षे असलेल्या चिमुकला गंभीर असल्याने त्याला जालना व तेथून औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. रस्त्याच्या वाटसरूंनी महिला व चिमुकल्यांचे सुखरूप पाण्याबाहेर काढले. दुसरबीड ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंचपती प्रकाश सांगळे व उपसरपंचपती तौफीक शेख यांनी रशीद कुरेशी व अनंता चनखोरे या दोघांचा हार घालून सत्कार केला. या घटनेची माहिती कळताच किनगावराजा पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेदार सोमनाथ पवार, दुय्यम ठाणेदार भाईदास माळी व पथक घटनास्थळी हजर झाले होते.