Home विदर्भ अयोध्या येथे होत असलेल्या भव्य राम मंदिर निर्माणसाठी संरक्षण खात्याच्या कंत्राटदाराकडून १५...

अयोध्या येथे होत असलेल्या भव्य राम मंदिर निर्माणसाठी संरक्षण खात्याच्या कंत्राटदाराकडून १५ कोटीची देणगी

246

राजेश एन भांगे

 संरक्षण खात्याकडून हातबॉम्ब पुरवठय़ाचे ४०९ कोटींचे कंत्राट मिळालेल्या नागपुरातील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लि. (सोलर समूह) या कंपनीचे प्रमुख सत्यनारायण नुवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांची देणगी देऊ केली आहे.
यापैकी पाच कोटी रुपयांचा धनादेश स्थानिक निधी संकलन समितीला दिला आहे.
समितीने याला दुजोरा दिला आहे.
नागपुरात निधी संकलन समितीला प्राप्त झालेली आतापर्यंतची ही सर्वाधिक रकमेची देणगी आहे.
इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लि. या कंपनीला अलीकडेच वरील कंत्राट मिळाले होते.
यावर आयुध निर्माणी मंडळाचे अधिकारी व कामगार संघटनांनी आक्षेप घेतला  होते.
मेक इन इंडियाच्या नावाखाली संघ परिवाराशी जुळलेल्या कंपन्यांना काम देण्याचे धोरण केंद्र सरकारने सुरू केले असून हा प्रकार आयुध निर्माणीच्या मुळावर येणारा आहे,
असा आरोप ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनच्या सदस्यांनी केला होता.
मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत नियमानुसारच कंत्राट मिळाल्याचा दावा कंपनीच्या व्यवस्थापकांकडून तेव्हा करण्यात आला होता.
आता याच कंपनीचे प्रमुख सत्यनारायण नुवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणी साठी १५ कोटी रुपयांची देणगी देऊ केली आहे.
यापैकी पाच कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी निधी संकलन समितीकडे दिला आहे.
उर्वरित निधी टप्प्या टप्प्याने दिला जाणार आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी १५ कोटी रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
यापैकी पाच कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाला असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
– गोविंद शेंडे, प्रदेश निधी संकलन समिती सदस्य व प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद, विदर्भ.