Home विदर्भ १५ फेब्रुवारी हा दिवस उत्सव म्हणून साजरा करा. – राजु चव्हाण

१५ फेब्रुवारी हा दिवस उत्सव म्हणून साजरा करा. – राजु चव्हाण

132
0

यवतमाळ /  घाटंजी – १५ फेब्रुवारी सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती असून हा दिवस गोर समाज बांधवांनी एक उत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय सचिव तथा घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजु चव्हाण यांनी केले. गतवर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्शभूमीवर सन उत्सव साजरे करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे समाज बांधवांचा हिरमोड झाला होता. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली असली तरी अद्याप कोरोनाचे संकट दूर झालेले नसल्याने कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक असून समाज बांधवांनी आपल्या घराघरावर पांढरा ध्वज लावावा. शक्य होईल त्यांनी नविन वस्त्र परिधान करावी. विशेष बाब म्हणून या दिवशी विविध व्यसनाचा त्याग करण्याचा संकल्प करावा. सद्गुरू संत सेवालाल महाराजांचे चारित्र वाचन करून त्यांचा आदर्श घ्यावा. यासाठी प्रत्येक तांड्यातील नायक, कारभारी हसाबी, नसावी, डावसाने व प्रत्येक तांड्यातील तरुण मंडळीनी पुढाकार घेऊन मोठ्या उत्सवाने हा उत्सव सर्वांच्या एकोप्याने समाज बांधवांनी साजरा करावा असे आवाहन राजु चव्हाण यांनी केले आहे.