Home विदर्भ आष्टी ग्रामीण रुग्णालयात करिता स्वतंत्र रुग्णवाहिका मिळण्याकरिता माजी आमदार श्री अमर काळे...

आष्टी ग्रामीण रुग्णालयात करिता स्वतंत्र रुग्णवाहिका मिळण्याकरिता माजी आमदार श्री अमर काळे यांनी पालकमंत्री श्री सुनील केदार यांना निवेदन

117
0

रवींद्र साखरे –  आष्टी

वर्धा / आष्टी ( शहीद ) –  हे आर्वी विधानसभा मतदारसंघातील एक तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असुन येथे ग्रामीण रूग्णालय कार्यरत आहे .

तालुक्यातील मुख्य शासकीय रूग्णालय असल्यामुळे येथे रूग्णांची मोठी गर्दी असते . तालुक्यामध्ये असलेली 108 रूग्णवाहीका हि राष्ट्रीय महामार्ग कमांक 6 वर तळेगांव ( शा.पं. ) येथे कार्यरत आहे . त्यामुळे ग्रामिण रूग्णालय , आष्टी परिसरातील ग्रामीण भागातील रूग्णांकरीता रुग्णवाहिकेची अडचन निर्माण होत आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणेने आष्टी ( शहीद) , जि. वर्धा तालुक्यातील तरूणवर्गाने 1942 च्या चलेजाव आदोलनामध्ये सकीय सहभाग नोंदवीला होता . या संग्रामामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तालुक्यातील 06 कांतीकारी शहीद झाले होते . या तालुक्याच्या स्थळी असलेल्या ग्रामिण रूग्णालयामध्ये रूग्णवाहीका असणे अतिशय गरजेचे आहे . करिता मा , महोदय , आष्टी ( शहीद) , तालुक्यातील रूग्णांची अडचन दुर करण्याचे दृष्टीने ग्रामिण रूग्णालय , आष्टी शहीद जिल्हा . वर्धा येथे तातडीने रूग्णवाहीका मंजुर करणेसंदर्भात कृपया संबंधीतांना निर्देश देण्यात यावे अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे