विदर्भ

ग्राहक चळवळीशी संबधित नोंदणीकृत संस्थांकडून ग्राहक जागृतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्ज आमंत्रित

Advertisements
Advertisements

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृतीचे क्षेत्रात ग्राहकाच्या हक्काचे सरंक्षण व संवर्धनाचे कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना ग्राहक जनजागृती करण्यासाठी आयोजनासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक संस्थांनी 21 जानेवारी पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनसाठी इच्छुक संस्था महाराष्ट्रातील ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात कार्य करणारी पंजीबंध्द संस्था असणे आवश्यक आहे. जनजागृती स्थानिक भाषामध्ये संदेश देणारे साईन बोर्ड, भिंती चित्र, होर्डींग इत्यादी साधनांचा वापर गाव, मंडई, भाजीबाजार, अशा प्रमुख ठिकाणी करावा लागेल. याशिवाय नुक्कड नाटक, पथनाटय, पपेट शोज, रागिणी, नौटंकी, पांडवाणी, विलु पट्टु, मॅरॅथॉन शर्यतीचे आयोजन करणे, शासनाने सूचित केलेल्या विषयावर शाळांमध्ये प्रदर्शन, भेसळ प्रतिबंधक सामुग्रीचे प्रदर्शन व शिबिरे आयोजित करणे, घडीपत्रिकेचे प्रकाशन करुन ग्रामीण भागात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याची कामे संस्थांना करावी लागतील.

अधिक माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर 26 जुलै 2017 च्या शासन निर्णयात दिली आहे. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like