Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सतिष गड्डमवार, संजय आत्राम, मीराबाई किणाके...

घाटंजी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सतिष गड्डमवार, संजय आत्राम, मीराबाई किणाके व फुलचंद जाधव यांची दावेदारी…!

146
0

सरपंच निवडीसाठी सबंधित नेत्याची दमछाक होणार..? 

 

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील अंत्यत महत्त्वाची समजली जाणारी कुर्ली ग्रामपंचायती मध्ये सद्यातरी सतिष लचमारेड्डी गड्डमवार, संजय तुकाराम आत्राम, मीराबाई हनमंतु किणाके व फुलचंद हिरामण जाधव सरपंच पदासाठी आपआपली दावेदारी सांगत आहे. तर उपसरपंच पदावर जोत्स्ना आकाश आत्राम या महिलेची निवड आत्ताच निश्चित मानल्या जात आहे. परंतु, सरीता रमेश अंगावार ह्या महिलेने सुद्धा उपसरपंच पदावर आपली दावेदारी सांगीतली आहे. मात्र, सरपंच पदाची निवडणूक आरक्षण निघाल्या नंतरच स्पष्ट होईल, असे सद्याचे चित्र आहे.
◼️ घाटंजी सह यवतमाळ जिल्ह्यातील तहसील कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी पुरुष सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे, तर ४ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागास प्रवर्गासाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. सदरचे आरक्षण हे ईश्वर चिठ्ठीने काढण्यात येणार आहे.
◼️ कुर्ली येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे कुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिन्ही वॉर्डातून ९ सदस्यांमधून सर्वात जास्त २८१ मते घेउन मीराबाई हनमंतु किणाके ही महीला निमगुडा वार्डातून अधिक मताधिक्याने विजयी झाली आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे २१ फेब्रुवारीच्या आत होणार, हे मात्र निश्चित.
◼️ निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार पुजा माटोडे, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे, निवडणूक अव्वल कारकून के. ए. मानवटकर आदीं निवडणूकीचे काम पाहत आहे.