Home जळगाव जळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का ?- फारुक शेख

जळगाव चे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का ?- फारुक शेख

43
0

 

रावेर (शरीफ शेख)
दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व थेट पुरस्कार दिले जातात त्याप्रमाणे यंदाही २०१९-२० चे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ऑनलाइन व समक्ष मागविले होते त्याप्रमाणे जळगावातील विविध संघटनातील संघटनाचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी ऑनलाईन व समक्ष प्रस्ताव ३१ डिसेंबर च्या आत सादर केलेले होते

सदर प्रस्तावाची छाननी होऊन ते पूरस्कार 26 जानेवारी देण्याची ची प्रथा आहे. नाशिक विभागातील धुळे व नंदुरबार येथील उत्कृष्ट खेळाडू व मार्गदर्शक यांची नावे घोषित करण्यात आली असून त्यांना उद्या २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक पोलिस कवायत मैदान येथे दिली जाणार आहे.

*जळगाव ला फक्त कोरोना मुळे पुरस्कार स्थगित*
सदर प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांच्या कडे चौकशी केली असता कोरोनामुळे आपले पुरस्कार घोषित करण्यात आलेले नाही असे उत्तर देण्यात आले वास्तविक पाहता जर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारी चे प्रमाण अत्यल्प झालेले आहे व आपल्या नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक येथे पुरस्कार घोषित होऊन देण्यात येणार आहे तर फक्त जळगावचे खेळाडू प्रशिक्षक हे वंचित राहणार आहे .

सदर खंत जळगाव हॉकी, फुटबॉल, स्विमिंग असोसिएशनचे सेक्रेटरी तथा शासनाचे उत्कृष्ट मार्गदर्शक व संघटक फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.

Unlimited Reseller Hosting