Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण २ व ४ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे संबधित...

यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण २ व ४ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे संबधित तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर होणार

446
0

अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण लोकसंख्येवर आधारीत, 

तर अनुसूचित जाती, जमाती व मागास प्रवर्ग महीला ईश्वर चिठ्ठीवर..?

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ -यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच पदाचे पुरुषांचे आरक्षण संबधित तहसील कार्यालयात २ फेब्रुवारी, तर अनुसूचित जाती, जमाती व मागास प्रवर्ग महीलांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी ईश्वर चिठ्ठीवर जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण लोकसंख्येवर आधारीत घोषीत करण्यात येणार आहे, असे आदेश ग्राम विकास विभागाने दिले आहे. सरपंच पदाचे आरक्षण कसे काढण्यात यावे, याबाबत राज्य निवडणूक आयोगा मार्फत अद्यापही कोणताही आदेश प्राप्त झालेले नाही, अशी माहिती निवडणूक सुत्रांकडून विश्वासनिय रित्या समजते. 

🟣 यवतमाळ जिल्ह्यात एकून ९८० ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असून त्यात जिल्ह्यातून ५५ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहे, तर ९२५ ग्रामपंचातीमध्ये निवडणूका घेण्यात आल्या. घाटंजी तालुक्यात एकून ५० ग्रामपंचायती मध्ये निवडणूका घेण्यात आल्या. त्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या, तर घाटंजी तालुक्यातील सावंगी (संगम) येथील माजी सरपंच अजय येल्टीवार गटाची एकमेव ग्रामपंचायत अविरोध निवडून आली आहे. त्यातील विजयी उमेदवार असे,
अजय राजाराम येल्टीवार, वेंकटीअम्मा श्रीनिवास कंधेवार, गोवर्धन लिंगारेड्डी पाटकुरवार, भाग्यश्री संजय कुसमवार, अश्विनी भोजारेड्डी गड्डमवार, बाबुलाल रावजी आत्राम, अनिता गुणवंत रावते, भोजारेड्डी गड्डमवार, अनुसया वेंकटी अंगावार ईत्यादी उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत विरोधी गटाने एकही उमेदवार विरोधात उभा केलेला नाही, हे विशेष. विशेषतः सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगातर्फे २१ फेब्रुवारीच्या आत घेण्याचे निर्देश असल्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
🟣 जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, सहाय्यक ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, ग्रामपंचायत निवडणूक लीपीक रत्नाकर राऊत, लिपीक कैलास निमकर, घाटंजीचे निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार पुजा माटोडे, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे, निवडणूक अव्वल कारकुन के. ए. मानवटकर, श्री. पाली आदीं ग्रामपंचायत निवडणूकीचे काम पाहत आहे.