Home जळगाव पाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन

पाचव्या दिवशी छावा मराठा युवा महासंघा तर्फे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन

49
0

रावेर (शरीफ शेख) 

संयुक्त किसान मोर्चा द्वारे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समक्ष 18 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत विविध संघटना तर्फे धरती कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु असून आज शुक्रवारी छावा मराठा युवा महासंघा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी “जय जवान जय किसान , किसान बचाओ देश बचाओ , संविधान बचाओ देश बचाओ , लडेंगे जितेंगे ” आदी विविध घोषणा देऊन आंदोलकांनी आसमंत दणाणून सोडले .

याप्रसंगी अमोल कोल्हे , मुकुंद सपकाळे , फारुख शेख , हरिश्चंद्र सोनवणे , प्रीतीलाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
*धरणे आंदोलनात सहभागी*

छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंदभाऊ सपकाळे , मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुख शेख , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , सचिव कुणाल पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष नेमाडे , शिवसेनेचे मनपा गटनेते अनंत जोशी , नगरसेवक अमर जैन , मेहरूण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निरंजन पाटील , अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील , शहिद भगतसिंग महानगरपालिका कर्मचारी युनियन चे अध्यक्ष अनिल नाटेकर , राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूनाथ सैंदाणे , दैनिक नजरकैदचे संपादक प्रविण सपकाळे , राष्ट्र सेवा दलचे ऍड. कोमल गोंधळी , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे महानगर अध्यक्ष अतुल महाजन , कास्ट्रईब कर्मचारी संघटनेचे रमेश सोनवणे ,छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष , श्रीकांत मोरे , महानगर अध्यक्ष भैय्या पाटील , जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश जाधव , किरण ठाकूर , उज्वल पाटील , संतोष महाले , कृष्णा जमदाडे , राहुल नेवे , कार्तिक असेरी , मयुरेश जैस्वाल , फईम पटेल , भारत सोनवणे , राजू कोळी , अकिल शेख , फारुख कादरी , वीर सावरकर रिक्षा युनियन अध्यक्ष दिलीप सपकाळे , आर.पि.आय. खरात गटाचे प्रवीण परदेशी , शहर काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार , पीपल्स फाऊंडेशन च्या गायत्री सोनवणे आदि आंदोलनात सहभागी सहभागी झालेत .

*केंद्र शासनाला निवेदन सादर*

धरणे आंदोलन समारोपप्रसंगी छावाचे अमोल कोल्हे ,मनियार बिरादरीचे फारुक शेख व बहुजन क्रांतीचे मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी विकास महाजन यांना निवेदन देण्यात आले.

Unlimited Reseller Hosting